बीआरटी मार्गात अपघात; एकाचा मृत्यू

0
126

सांगवी दि. 16 ऑगस्ट (पीसीबी)
बीआरटी मार्गात कार आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 15) सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली.

पोलीस हवालदार राहूल हरिनाथ सुतार यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालक शिवकुमार बाबुराव कोडगीरे आणि दुचाकी चालक पार्थ वैभव काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीआरटी मार्गात इतर वाहनांना प्रवेश बंदी आहे. तरी देखील कार चालक कोडगीरे आणि दुचाकी चालक पार्थ काळे यांनी बीआरटी मार्गात बेकायदेशीरपणे वाहने आली. या दोन्ही वाहनांमध्ये गोविंद गार्डन चौकाजवळ अपघात झाला. या अपघातात दुचाकीच्या मागील सीटवर बसलेले हरिश शर्मा यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. तसेच दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.