बीआरटी मार्गातून भरधाव वेगात दुचाकी चालवणे बेतले जीवावर

0
207

पिंपळे सौदागर, दि. १० (पीसीबी) – बीआरटी मार्गातून भरधाव वेगात दुचाकी चालवत असताना रस्त्यात आलेल्या एका महिलेला वाचविण्याचा प्रयत्न करताना दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. ही घटना 24 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता स्वराज गार्डन कोकणे चौक ते नाशिक फाटा बीआरटी मार्गावर घडली.

विशाल संजय चव्हाण (वय 24, रा. वाकड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलीस हवालदार सुनील जाधव यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास विशाल चव्हाण हा त्याच्या दुचाकीवरून कोकणे चौकाकडून नाशिक फाटाकडे जाणाऱ्या बीआरटी मार्गातून भरधाव वेगात जात होता. काटे-पाटील बस स्टॉप स्वराज गार्डन जवळ आल्यानंतर विशाल याच्या दुचाकीला एक महिला आडवी आली. महिलेला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना विशाल याची दुचाकी लोखंडी ग्रीलला धडकली. त्यामध्ये विशाल गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.