बीआरटी मधील स्कूल बस अपघात प्रकरणी कार चालक व बस चालका विरोधात गुन्हा दाखल

0
65

पिंपरी, दि. 30 (प्रतिनिधी)
पिंपरी येथील बीआरटी रोडवर स्कूल बस व कार अपघात प्रकरणी पोलिसांनी काार व बस चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात सोमवारी (दि.29) ऑटो क्लस्टर समोरील बीआरटी रोडवर झाला.

बीएमडब्ल्यू कार चालक यश अरुण मित्तल (वय 29, रा.निगडी) व बस चालक योगेश एकनाथ खोडके (वय 28, रा.भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात शाकिर जिनेडी यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीआरटी रोडवर खासगी वाहनांना परवानगी नसताना देखील खासगी शाळेचा बस चालक व कार चालक यांनी हयगयीने व भरधाव वेगाने चालवून समोरा समोर धडक दिली. यावेळी बस मध्ये शाळेतील 15 मुले होती. मुलांच्या जीवाला धोका निर्माण केल्या प्रकरणी व बीआरटी रोडवर वाहन चालवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. बस चालक या अपघातात जखमी झाला असून सध्या त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.