बीआरटी बस स्टॉपला कंटेनरची धडक

0
190

दिघी, दि. १५ (पीसीबी) – विरुद्ध दिशेने भरधाव वेगात कंटेनर चालवून बीआरटी बस स्टॉपला धडक दिली. या प्रकरणी कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 13) रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास मॅगझिन चौक, दिघी येथे घडली.

बाळासाहेब कांताराम पठारे (वय 50, रा. च-होली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लालूप्रसाद सेवादास (वय 26, रा. उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लालूप्रसाद यांनी त्याच्या ताब्यातील कंटेनर (एचआर 55/वाय 2421) निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवला. मॅगझिन चौकात विरुद्ध दिशेने कंटेनर चालवून लालूप्रसाद याने कंटेनरने बीआरटी बस स्टॉपला धडक दिली. यामध्ये बस स्टॉपचे 25 ते 30 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.