बीआरटीएस मार्ग, पोलीस चौकीजवळ ज्येष्ठांसाठी शौचालय बांधा – समीर जावळकर

0
331

पिंपरी, दि. ६ (पीसीबी)- निगडी, प्राधिकरणातील सेक्टर 23 येथील बीआरटीएस मार्गावार आणि प्राधिकरण पोलीस चौकीच्या शेजारील एसटी बस स्थानकाजवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी शौचालय बांधण्याची मागणी भाजपचे उपाध्यक्ष समीर जावळकर यांनी पालिकेकडे केली आहे.

याबाबत सह शहर अभियंता मनोज सेठिया यांना निवेदन दिले आहे. त्यात जावळकर यांनी म्हटले आहे की, सेक्टर क्रमांक 26 येथील बीआरटी रोडवर अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला शतपावली करण्याकरिता रोज सकाळी, संध्याकाळी जात असतात. काही ज्येष्ठ नागरिकांना मधुमेहाचा त्रास असल्याने त्यांना वारंवार मूत्र विसर्जन करण्याकरिता जावे लागते. या ठिकाणी कोणतीही शौचालयाची सोय नाही. त्यामुळे नाईलाजास्तव उघड्यावर मूत्र विसर्जन करावे लागते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी देखील पसरत आहे.

त्यासाठी नागरिकांच्या मागणीनुसार प्राधिकरणातील सेक्टर 23 येथील नवीन बीआरटीएस रोड आणि प्राधिकरण पोलीस चौकीच्या शेजारील एसटी बस स्थानकाजवळ पालिकेतर्फे शौचालय बांधून देण्याची विनंती जावळकर यांनी निवेदनातून केली आहे.