बिल्डिंग ला गेट बसवल्याचा रागातून बियरच्या बाटलीने मारहाण

0
230

बिल्डिंगला लोखंडी गेट बसवत असल्याच्या रागातून चुलत भावनेचं बियरच्या बॉटल ने मारहाण केली आहे. ही घटना रविवारी (दि.26) आकुर्डी गावठाण येथे घडली आहे.

सुभाष विठ्ठल जगताप (वय 51 रा. आकुर्डी गावठाण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून सचिन रामचंद्र जगताप रा. आकुर्डी गावठाण याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घराला लोखंडी गेट लावत असताना आरोपीने फिर्यदीला शिवीगाळ केली.तसेच बियर ची काचेची बॉटल डोक्यात मारून जखमी केले. यावरून निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.