बियरची बाटली डोक्यात मारून दोघींना लुटले

0
392

निगडी, दि. ८ (पीसीबी) – बियरची बाटली डोक्यात मारून पाच जणांनी मिळून दोन महिलांना लुटले. ही घटना सोमवारी (दि. 6) रात्री अकरा वाजताच्या सुमारास ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे घडली.

छोटा बीच्या उर्फ युवराज संतोष अडागळे, रोहित राजू गायकवाड, सौरभ बाळू अडागळे, आशिष दिनेश माकोडे, दीपक उर्फ दिप्या (सर्व रा. जाधववाडी, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांची मैत्रीण सोमवारी रात्री ट्रान्सपोर्ट नगर निगडी येथील शेर पंजाब हॉटेल येथे जेवण करण्यासाठी गेल्या होत्या. जेवण झाल्यानंतर त्या रिक्षाची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळी त्यांच्या ओळखीचे आरोपी तिथे आले. त्यांनी फिर्यादी यांच्याकडील पर्स, मोबाईल फोन, रोख रक्कम असा 14 हजार 900 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेण्याच्या उद्देशाने फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणीला मारहाण केली. रस्त्यावर पडलेली बियरची बाटली डोक्यात मारून फिर्यादी यांना दुखापत केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.