पिंपरी दि. ४ (पीसीबी) : रावेत- किवळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याबाबत एक व्हॉट्सअॅप पोस्ट मोठया प्रमाणात व्हायरल झली आहे. या पोस्टमध्ये रावेत भागातील कोहिनूर ग्रॅंड्युर, फेलिसिटी आणि सिल्वर ग्रेशिया सोसायटीच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सांगितले जात आहे. पण, ही निव्वळ अफवा असल्याचे समोर आले आहे. मात्र, या एका व्हॉट्सॲप पोस्टमुळे नागरिकांची चांगलीच भंबेरी उडाली. या परिसरात बिबट्या आढळला नसून ही पोस्ट अफवा असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
लहान मुलांना तर गावकरी रात्रंदिवस घरातच डांबून ठेवू लागले आहेत. याला कारण ठरली आहे ती सोशल मीडियावर व्हायरल झालेली एक पोस्ट. रावेत भागात बिबट्याचा वावर असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. ‘कोहिनूर ग्रॅंड्युर, फेलिसिटी आणि सिल्वर ग्रेशिया सोसायटीच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी’ असे या पोस्टमधून सांगण्यात आले आहे. बिबट्याच्या या अफवेमुळे नागरिक मात्र चांगलेच धास्तावले आहेत. गावात रात्री कोणीही घराबाहेर पडायला तयार नव्हते. रात्रीच काय तर भर दिवसाही घराबाहेर पडायला नागरिक घाबरत आहेत.