बिट मार्शल वरील पोलिसांना मारहाण

0
345

आकुर्डी,दि.२५(पीसीबी) – बिट मार्शल वरील पोलिसांना एका व्यक्तीने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. २४) सकाळी पांढरकर वस्ती, आकुर्डी येथे घडली.

पोलीस शिपाई सचिन विष्णू जगताप (वय ३१), पोलीस शिपाई केंद्रे अशी मारहाण झालेल्या पोलिसांची नावे आहेत. जगताप यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय उत्तम कदम (वय ४९, रा. पांढरकर वस्ती, आकुर्डी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आकुर्डी बिट मार्शलवर कर्तव्यावर असताना त्यांना पोलीस नियंत्रण कक्षातून माहिती मिळाली. पांढरकर वस्ती आकुर्डी येथे पोलीस मदत हवी असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार पोलीस शिपाई जगताप आणि केंद्रे हे कॉलवर पांढरकर वस्ती येथे गेले. त्यावेळी आरोपीने पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण करत दुखापत केली. निगडी पोलीस तपास करीत आहे.