बिजलीनगर, चिंचवड परिसरात संजोग वाघेरेंच्या गावभेट दौऱ्यास प्रतिसाद !

0
212

पिंपरी, दि.८ (पीसीबी) – गद्दारांना गद्दारी काय असते याचा धडा शिकविण्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व कार्यकर्ते व सामान्य मतदार आता सज्ज झाला असून आता त्यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब करण्यासाठी वाट पहावी लागणार असल्याचे संजोग वाघेरे-पाटील यांनी सांगितले. आज सोमवारी (दि. 8) सकाळी झालेल्या वाल्हेकरवाडी – रावेत गावभेट दौऱ्यात ते मतदारांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी विश्वास व्यक्त केला. या वेळी सेल्फी, हस्तांदोलन अन शुभेच्छांनी गावभेटी दौऱ्याचा उत्साह वाढला होता.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) मुख्य प्रवक्ते माधव पाटील, सागर चिंचवडे, गणेश भोंडवे, कामगार आघाडीचे संदीप शिंदे, राहुल धनवे, आम आदमी पार्टीचे शहर संघटक सचिन पवार, कमलेश रनावरे, वैजनाथ शिरसाठ, रोहित सरनोबत, भरत दास, दगडूछ मरळे, माथाडी कामगार संघटनेचे हनुमंत तरडे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाघेरे पाटील म्हणाले की, तरुणांना नोक-या नाहीत आजचा तरुण बेरोजगार झाला आहे. देश देशोधडीला लागला आहे, शेतक-यांचा विषय गंभीर आहे. कामगारांना न्याय मिळत नाही त्यामुळे मतदारांनी जागे झाले पाहिजे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. शहरी आणि गावातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी मी पूर्ण पर्यंत करणार असल्याचे मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, मतदारांकडून आणि जेष्ठ नागरिक, तरुणांकडून उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचे मनापासून स्वागत केले. अडीअडचणीत असलेल्या सर्वसामान्यांना मदतीचा हात देणारं नेतुत्व आणि समाजाची असलेलं नाळ अश्या भावना या वेळी मतदारांनी व्यक्त केल्या.