बिग बॉस मराठी 5 च्या विजेत्याचं नाव समोर! सोशल मीडियावर चर्चेला उधाण

0
82

दि. 25 (पीसीबी) बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन पहिल्या दिवसापासून प्रचंड चर्चेत आहे. मात्र आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन 100 दिवसांचा नसून अवघ्या 70 दिवसांचा असणार आहे. यामुळे आता बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन संपायला फक्त दोनच आठवडे शिल्लक राहिले आहेत. अशातच आता प्रेक्षक देखील आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र फ्रेण्ड फिनाले पूर्वीच यंदाच्या सीझनच्या विजेत्याचं नाव सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

‘हा’ ठरणार बिग बॉस मराठीचा विजेता :

बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनचा विजेता हा 70 दिवसातच मिळणार आहे. त्यामुळे बिग बॉस प्रेमी देखील विजेत्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता बिग बॉसने अधिकृतपणे जाहीर केलं आहे की, बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले हा 6 ऑक्टोबरला पार पडणार आहे. मात्र सोशल मीडियावर त्याआधीच विजेत्याचं नाव चर्चेत आहे. अभिजीत सावंत हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता असल्याचं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कारण बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या स्पर्धकांची एक यादी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या यादीमध्ये स्पर्धकांची नाव आणि विजेता व उपविजेला असा उल्लेख देखील केलेला दिसत आहे. पाहता क्षणी ही विकीपीडियावर यादी असल्यासारखं दिसत आहे. त्यामुळे ग्रँड फिनाले आधीच विजेत्याचं नाव समोर आल्याचं सोशल मीडियावर बोललं जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या यादीनुसार, अभिजीत सावंत हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता ठरला आहे. तर अंकिता चव्हाण पहिली उपविजेती असणार आहे. याशिवाय सूरज चव्हाण दुसरा उपविजेता ठरल्याचं यादीवरुन दिसत आहे. त्याशिवाय, जान्हवी तिसरी उपविजेती तर निक्की तांबोळी चौथी उपविजेती ठरल्याचं व्हायरल यादीमध्ये दिसत आहे.

बिग बॉस मराठीच्या यंदाचा सीझनला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे, मग ते स्पर्धकांमुळे असो किंवा होस्ट अभिनेता रितेश देशमुख याच्यामुळे. कारण बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनने आधीच्या सीझनच्या तुलनेत टीआरपीमध्ये देखील बाजी मारली आहे.