बिग बॉस मराठी 5 चा महाअंतिम सोहळा ‘या’ दिवशी पार पडणार !

0
103

मुंबई, दि. 24 (पीसीबी) : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला प्रेक्षकांनी प्रचंड चांगला प्रतिसाद दिला आहे. कारण यंदाच्या सीझनमधील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन झालं आहे. तसेच या सीझनमध्ये पुढे अजून नेमका कोणता ट्विस्ट येणार याची देखील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र आता ‘बिग बॉस’च्या टीमकडून एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

बिग बॉस मराठी 5 चा खेळ आता लवकरच संपणार असल्याची अधिकृत घोषणा नुकतीच बिग बॉसकडून करण्यात आली आहे. बिग बॉसच्या या निर्णयामुळे स्पर्धकांसह प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसला असल्याचं पाहायला मिळतं आहे. साधारणपणे यापूर्वीचे सिझन हे 100 दिवसांचे होते. पण आता बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन हा इतर चार सीझनपेक्षा वेगळा असल्याचं बिग बॉसने नेहमीच सांगितलं आहे. त्यामुळे आता हा सिझन 70 दिवसांतच आटोपता घेणार असल्याची घोषणा बिग बॉसकडून करण्यात आली आहे.

बिग बॉसने हा सीझन रंजक होण्यासाठी हा ट्विस्ट आणण्यात आला आहे. त्यामुळे बिग बॉसचे दिवस देखील कमी करण्यात आले आहेत. मात्र आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, बिग बॉस मराठी 5 चा महाअंतिम सोहळा कधी पार पडणार? तर येत्या 6 ऑक्टोबरला बिग बॉस सीझन 5 चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे.

येत्या 6 ऑक्टोबरला बिग बॉस मराठी 5 चा महाअंतिम सोहळा असल्याने हा शो येत्या 14 दिवसांतच पार पडणार आहे. मात्र यावेळी देखील बिग बॉसने त्यांचा आवडता एक ट्विस्ट आणला आहे. यावेळी बिग बॉसने घरातील सगळे सदस्य या आठवड्यासाठी थेट नॉमिनेट केले आहेत. कारण आता बिग बॉसचा खेळ पुढच्या 14 दिवसांत संपणार आहे. त्यामुळे बिग बॉसकडूनच हे सगळे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

परंतु आता या आठवड्यात ज्या सदस्यांची निर्णय घेण्याची क्षमता नाही त्या सदस्यांना थेट टार्गेट करण्यात आलं आहे. यामध्ये घरातील जवळपास सगळ्याच सदस्यांनी निक्की तांबोळीला टार्गेट केल्याचं पाहायला मिळालं आहे. सध्या बिग बॉसच्या घरात वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, पंढरीनाथ कांबळे, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर हे स्पर्धक राहिले आहेत.