“बिग बॉस फेम निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलच्या फोटोमुळे खळबळ!”

0
3

दि . १४ ( पीसीबी ) –  अभिनेत्री निक्की तांबोळी आणि तिचा प्रियकर अरबाज पटेल (Arbaz Patel) सध्या त्यांच्या नव्या फोटोशूटमुळे इंटरनेटवर चर्चेत आहेत. दोघांनी नुकतेच इंस्टाग्रामवर (Instagram) काही आकर्षक फोटो शेअर केले आहेत, ज्यात त्यांची सिझलिंग केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येत आहे. हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

ब्लॅक ड्रेसमधील हॉट अंदाज –

या नवीन छायाचित्रांमध्ये निक्की आणि अरबाज एकमेकांमध्ये हरवलेले दिसत असून कॅमेऱ्यासाठी त्यांनी अनेक रोमँटिक पोज दिल्या आहेत. अरबाज निक्कीला जवळ पकडून तिच्या डोळ्यात बघताना दिसतोय, तर काही फोटोंमध्ये तो निक्कीच्या ओठांच्या अगदी जवळ आलेला दिसतोय. दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते; निक्कीने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता, तर अरबाज काळ्या शर्टमध्ये आकर्षक दिसत होता.

हे फोटो शेअर होताच चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कौतुकाचा वर्षाव केला. एका यूजरने त्यांना “हॉट” म्हटले, तर अनेकांनी फायर इमोजी पोस्ट करून त्यांच्या केमिस्ट्रीला दाद दिली. निक्की आणि अरबाजच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

‘बिग बॉस मराठी’ पासून सेलिब्रिटी मास्टरशेफपर्यंतचा प्रवास-

निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्या नात्याची चर्चा ‘बिग बॉस मराठी सीझन ५’ पासून सुरू झाली होती. तेव्हापासून हे दोघेही एकमेकांसोबत असून अनेकदा शहरात एकत्र फिरताना दिसतात. निक्कीने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात दिलेल्या मुलाखतीत अरबाजला डेट करत असल्याचे सांगितले होते. ती म्हणाली होती, “मी एका अशा व्यक्तीच्या शोधात होते ज्याच्याशी माझे मन जुळेल. अरबाजला भेटल्यावर मला त्याच्याशी एक खोल कनेक्शन जाणवले. आमच्यात जे आहे ते मैत्रीपेक्षा खूप जास्त असून ते प्रेमच आहे हे आम्ही नाकारू शकत नाही.”

निक्कीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ती नुकतीच सोनी टीव्हीच्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या कार्यक्रमात दिसली होती. या शोमध्ये तिच्यासोबत दीपिका कक्कर इब्राहिम, तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, अर्चना गौतम, फैजल शेख, अभिजीत सावंत, उषा नाडकर्णी, यांसारखे कलाकारही सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचा विजेता गौरव खन्ना ठरला असून, शोचा नुकताच समारोप झाला आहे.