बिअर शॉपी चालकाकडून लाच घेणाऱ्या पोलिसाला अटक

0
83

तळेगाव, दि. 15 (पीसीबी) : कोणताही त्रास न देण्यासा बिअर शॉपी चालकाकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना पोलीस हवालदारास अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. १४) मंत्रा सिटी रोड, तळेगाव दाभाडे येथे ही कारवाई केली.

सतीश अरुण जाधव (वय ४२) असे अटक करण्यात आलेल्या तळेगाव हवलदाराचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बिअर शॉपी चालवित असून त्यांच्या मालकीच्या दोन बिअर शॉपी आहेत. दरम्यान, पोलिस हवलदार सतीश जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे बिअर शॉपी व्यवस्थित चालु ठेवण्यासाठी, कोणताही त्रास न देण्यासाठी तसेच खोटे गुन्हे दाखल न करण्यासाठी बार हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली. त्यानुसार, संबंधित तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपी सतीश जाधव याल पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.