बिअर बार मध्ये बसून शासकीय फाईलची पडताळणी

0
90

दि . २८ ( पीसीबी ) – नागपूरात सरकारी तीन अधिकारी बिअर बार मध्ये बसून शासकीय फाईलची पडताळणी आणि सह्या करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे. मनीष नगर येथील एका बारमध्ये दुपारच्या सुमारासचा हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर येते आहे. त्यातील एक जण दारूचे घोट घेत शासकीय फायलींना पडताळताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या तीन व्यक्ती कोण आहेत आणि त्यांच्याकडे कोणत्या फाईल्स होत्या? यासंदर्भात माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील मनीषनगर भागातील एका प्रसिद्ध बीअर बारमधील हा प्रकार असून दुपारी ३ च्या सुमारास च्या सुमारास तीन व्यक्ती बारमध्ये आले होते. यावेळी त्यांनी आपल्या सोबत एक फायलींचा मोठा गठ्ठा हि आणला होता. यावेळी त्यांनी दारूची ऑर्डर दिली आणि त्यानंतर टेबलावर शासकीय फायलींचा गठ्ठा खोलून त्यांची पडताळणी करण्यास सुरुवात केली. मात्र हे अधिकारी नेमके कोण आणि कोणत्या विभागाचे आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. तर प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांपैकी एका व्यक्तीने फाईल्सवर सह्या करायला सुरुवात केली. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.