बाहेरच्या पक्षातून आमच्या पक्षात आलेल्यांना….; चाकणकरांचा रुपाली पाटील ठोंबरेवर घणाघात

0
81

पुणे, दि. 18 (पीसीबी) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यानंतर आता चाकणकर यांना पक्षातूनच विरोध सुरू झाला आहे. त्यांच्या निवडीने पक्षातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एक व्यक्ती एक पद नियमानुसार रुपाली चाकणकर यांच्याकडील महिला प्रदेशाध्यक्षपद काढून घ्या, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे. यावरुन आता रुपाली चाकणकर यांनी ठोंबरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

“एक व्यक्ती म्हणजे पक्ष नाही आणि बाहेरच्या पक्षातून आमच्या पक्षात आलेल्या व्यक्तींना पक्षाची वैचारिक भूमिका माहित नाही, पक्षाची ध्येय धोरण माहित नाहीत. त्यामुळे सातत्याने एकच व्यक्ती टीका करत असेल तर समजून जावं की मानसिकता काय आहे, मला ते फार महत्वाच वाटत नाही, असं प्रत्युत्तर रुपाली चाकणकर यांनी रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिले.

“राज्यभर काम करत असताना राज्यात संघटना उभी केली. आयोगाचं काम करत असताना आयोगातील काम केलं आहे, त्यामुळे अशा व्यक्तींवर बोलण मला फार उचित वाटत नाही. माझा आनंदाचा क्षण आहे, पक्षाने दिलेली जबाबदारी मी पेलली, हा विश्वास पक्षाला वाटला म्हणून पक्षाने मला दिली, याबद्दल पक्षाचे आभार, असंही रुपाली चाकरणकर म्हणाल्या.

काही दिवसापूर्वीही रुपाली पाटील ठोंबरे आणि रुपाली चाकरणकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले होते. तर आता चाकणकर यांना पुन्हा एकदा आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. काल पुण शहरचे अध्यक्ष दीपक मानकर यांनीही नाराजी व्यक्त केली. काल त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, यावेळी त्यांनी पक्षाला राजीनामा देणार असल्याचे जाहीर करत उघड-उघड नाराजी व्यक्त केली.