बावनकुळेंनी बायको सुध्दा पळवून आणली

0
324

– भाजपाच्या सत्कार सोहळ्यात नितीन गडकरी यांनी सांगितला किस्सा
नागपूर,दि. १३ (पीसीबी) : चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले. नागपुरात बावनकुळे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांचा जीवनपट ऑटोरिक्षा ड्रायव्हर असा होता. तिथून त्यांनी जीवनाची सुरवात केली. बाकीचं ते सांगत नाही त्यांनी बायकोपण त्यांनी पळवून आणली. असं म्हणताच, सत्कार कार्यक्रमात एकच हशा पिकला. तुम्हाला माहिती नसेल. त्यांची बायको कुणबी समाजाची आहे आणि ते तेली समाजाचे आहेत. ते त्यांनी कसं केलं ते तुम्हाला एकट्यात सांगतीलं. पण, ते आता तरुण कार्यकर्त्याच्या उपयोगाचं सिक्रेट आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी या भानगडीत पडू नये. त्याचे वडील, त्याचे भाऊ गरिबीची परिस्थिती होती. कोराडीच्या प्रकल्पात त्यांची जमीन गेली. त्यावेळी संघर्ष करून त्यांनी ती मिळविली. सुरुवातीला बावनकुळेंनी छत्रपती सेनेचं काम सुरू केलं. प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन केलं.

अडकलेल्या योजना पूर्ण केल्या
नितीन गडकरी म्हणाले, भाजपची जिल्ह्यातील स्थिती चांगली नव्हती. त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. त्यानंतर कामठी मतदारसंघ मजबूत केलं. जिल्ह्यात भाजप भक्कम करण्याचं काम चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. खूप मेहनत घेतली. झोकून देऊन काम करणारे आणि बोटानं मलम लावणारे असे दोन प्रकारचे कार्यकर्ते असतात. झोकून देऊन काम करणारा जिद्दीचा कार्यकर्ता म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे होय. त्यांनी प्रकृती, घराची चिंता केली नाही. माणसं जोडली. न्याय मिळवून दिला. जनतेचं प्रेम मिळविलं. देवेंद्र यांनी त्यांना ऊर्जा खात दिलं. त्या खात्यात त्यानी उत्तर काम केलं. प्रश्न सोडविले. विजेच्या पंपाचा बॅकलॉक संपविला. नागपूरच्या अडकलेल्या योजना त्यांनी पूर्ण केल्या.

मी हे करेनच अशी जिद्द हवी
नितीन गडकरी म्हणाले, बावनकुळेंमध्ये एवढं कर्तुत्व आहे की, ते माणसाला बाई बनवतील आणि बाईला माणूस बनवतील. कोणती फाईल कशी फिरवतील. काही सांगता येत नाही. पण, लोकांचे प्रश्न ते मार्गी लावतात. प्रत्येक सिक्रेट मी सांगू शकत नसल्याचंही गडकरी म्हणाले. कोणाचा निधी होता. कोणत्या आमदाराचे पत्र होते. काम कुठं झालं काही पत्ता लागत नव्हता. पण, काम होत होते. कोणतंही काम करताना ओनरशीप हवी. ओनरशीप नसली तर ते काम होत नाही. मी हे करीन ही जिद्द बावनकुळेंच्या जवळ होती. त्यामुळं ऑटोरिक्षा चालक भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाला.