बाळाासाहेब थोरात यांंना भाजपची ऑफर

0
187

मुंबई, दि. ७ (पीसीबी) : नुकताच कॉंग्रेसचे विधीमंडळ पक्षाचे नेते पदाचा राजीनामा बाळासाहेब थोरात यांनी दिल्यानंतर कॉंग्रेसमधील वाद विकोपाला गेल्याचं समोर आले आहे. कॉंग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन ज्या घडामोडी झाल्या त्यावरून संपूर्ण राज्याचे लक्ष बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेकडे लागून होते. त्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित तांबे यांच्याच बाजूने भूमिका मांडत कॉंग्रेसच्या हायकमांडकडे नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले होते. त्यानंतर विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे पक्षनेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केले आहे.

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यावरून पटोले विरुद्ध थोरात हा वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. बाळासाहेब थोरात यांच्याकडील प्रदेशाध्यक्ष पद काढून नाना पटोले यांना देण्यात आल्यानंतर कॉंग्रेसमधील एक गट नाराज झाला होता, त्यात सत्यजित तांबे यांच्याबद्दल उमेदवारीच्या दरम्यान एबी फॉर्मचा गोंधळ झाल्याने आणखीच धार मिळाली आहे. मात्र, याच काळात सत्यजित तांबे यांना भाजपने दिलेला पाठिंबा आणि त्यानंतर झालेले राजकारण बघता बाळासाहेब थोरात यांची भूमिका महत्वाची मानली जात होती. त्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी मोठी भूमिका घेतली आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेसच्या हायकमांडकडे नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्याबाबत पक्षाकडे नाराजी व्यक्त केली होती. याच दरम्यान बाळासाहेब थोरात यांच्यासह सत्यजित तांबे यांच्या बद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑफर देऊन टाकली आहे. कुणाला आमच्या पक्षात यायचे असेल तर आम्ही घेऊ म्हंटले आहे.

याशिवाय सत्यजित तांबे यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलं आहे. त्यामध्ये बाळासाहेब थोरात यांचे कॉंग्रेसमधील जे स्थान आहे, त्यापेक्षा आमच्या पक्षात नककीचे मोठे स्थान राहील याची काळजी घेऊ असेही बावनकुळे यांनी म्हंटले आहे. कॉंग्रेसमधील वाद विकोपाला गेलेला असतांना बावनकुळे यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे. त्यावर थोरात आणि तांबे यांना दिलेली ऑफर बघता येत्या काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.