बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीला अटक

0
375

पिंपरी, दि.२२ (पीसीबी) – बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या पत्नीला तिच्या माहेरी जाऊन मारहाण करणाऱ्या पतीवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार मंगळवारी (दि.20) इंदिरानगर झोपडपट्टी येथे घडला आहे.

यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्या वरून सलीम अकबर शेख (वय 24) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या बाळंतपणासाठी माहेरी गेल्या होत्या यावेळी आरोपी दारु पिऊन गेल्या असता फिर्यादी यांनी घरी पिऊन का आलात अशी विचारणा केली. याचा च राग येऊन आरोपीने फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी व घरातील चाकूने मारहाण करत जखमी केले आहे. यावरून पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.