बाल शाहीर आणि महिला शाहीर पुरस्कार वितरण

0
333

पिंपरी, दि. १० (पीसीबी)- प्रतिवर्षी प्रमाणे संत तुकाराम प्रतिष्ठाण आणि महाराष्ट्र शाहीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा बालशाहीर आणि महिला शाहीर पुरस्काराचे वितरण या वर्षी दी.९ मार्च २०२३ रोजी सायं. ७ वाजता संत तुकाराम मंदिर, संत तुकाराम नगर,पिंपरी या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला.

बालशाहीर पुरस्कार अनुक्रमे चि.परमवीर आव्हाड,चि.राजरत्न पांडगळे, चि.प्रज्ञेश गायकवाड यांना तर महिला शाहीर पुरस्कार सौ.भारती फिस्के आणि सौ उर्मिला राजे यांना देण्यात आले.या पुरस्काराचे पुरस्कार्थी प्रसिद्ध उद्योजक श्री. दीनानाथ जोशी हे होते.तर संजीवनी महिला शाहिरी पथकाने या कार्यक्रमाचे संयोजन केले.. यावेळी सर्व बाल व महिला शाहीरानी गण,मुजरा,शिव जन्म ,अफझल खान वध,बाजीप्रभू देशपांडे,नारी शक्ती असे विवीध पोवाडे सादर केले युवाशाहीर चैतन्य काजुळकर व गुरूराज कुंभार यांनी शिवगीत गात रंगत आणली
ढोलकीवर उधव गुरव,हारमोनियम ईशा बांदिवडेकर,तालवाधय ओंकार चंदगडकर,अमर कापसे यांनी साथ केली.

या प्रसंगी महाराष्ट्र शाहीर परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष शाहीर प्रकाश ढवळे,उद्योजक श्री. दीनानाथ जोशी, संजीवनी महिला शाहिरी पथकाच्या अध्यक्षा सौ. वनिता मोहिते ,संत तुकाराम प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री नंदू कदम, तसेच हरिभाऊ करमाळकर , माणिकराव अहिरराव , राजेंद्र आहेर उपस्थित होते.सौ.प्रचीती भिषणुरकर यांनी सूत्रंचालन केले..सौ. चित्रा कुलकर्णी,सौ स्मिता बांदिवडेकर,यांनी सहकार्य केले. सौ वनिता मोहिते यांनी आभार मानले