बालेवाडी येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड शिवसेनेच्या वतीने आढावा बैठक संपन्न

0
100

पिंपरी,दि. १४ – मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना शनिवार (दि.१७) रोजी निधीचे वाटप होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज (दि.१३) रोजी पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने आढावा बैठक संपन्न झाली.

चिंचवड गाव येथील चिंचवडे लॉन्स येथे ही आढावा बैठक संपन्न झाली. मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पिंपरी चिंचवड शिवसेनेचे शहरप्रमुख निलेश तरस यांनी या बैठकीचे नियोजन केले होते. या आढावा बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख निलेश तरस यांनी मार्गदर्शन केले.

या आढावा बैठकीला बाळासाहेब वाल्हेकर (जिल्हाप्रमुख), शैलाताई पाचपुते (जिल्हा संघटिका), राजेश वाबळे (उपजिल्हाप्रमुख), निलेश गुलाब तरस (पिंपरी चिंचवड शहर प्रमुख), सरिता ताई साने (शहर संघटिका), दिलीप पांढरकर (उपजिल्हा प्रमुख), खंडू शेठ चिंचवडे (उपजिल्हाप्रमुख), संतोष बारणे (चिंचवड विधानसभा प्रमुख), निखिल येवले (पिंपरी विधानसभा प्रमुख), शारदाताई वाघमोडे (चिंचवड विधानसभा संघटिका), राजेंद्र तरस (युवा सेना जिल्हाप्रमुख), माऊली जगताप (युवासेना शहर प्रमुख), रितू ताई कांबळे (युवती सेना पिंपरी चिंचवड शहर प्रमुख), सायली साळवी (युवती सेना उपजिल्हा प्रमुख), सुनीता ताई चदणे (उपशहर संघटिका) आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर १७ ऑगस्ट रोजी बालेवाडी येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या नियोजनाचा पिंपरी चिंचवड शहर स्तरावर खासदार श्रीरंग बारणे आणि शहरप्रमुख निलेश तरस यांनी आज आढावा घेतला. कार्यक्रमाच्या दृष्टीने नियोजन करून संबंधितांनी आपसांत योग्य समन्वय ठेऊन सोपवलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.