बालेकिल्ल्यातील डॅमेज कंट्रोलसाठी अजित पवार अॅक्शन मोडमध्ये

0
77

पुणे, दि. २१ : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला काही दिवसांपुर्वी बालेकिल्ल्यामध्ये मोठं खिंडार पडलं. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. ४ पदाधिकाऱ्यांसह एकूण २४ जणांनी शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यामध्ये माजी आमदार विलास लांडेंचे निकटवर्तीय अजित गव्हाणेंचा देखील समावेश होता. बालेकिल्ल्यातील या डॅमेज कंट्रोलसाठी अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशानंतर दुसऱ्या दिवशी सर्व आजी-माजी नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर आज ते पिंपरी चिंचवडमध्ये मेळावा घेत आहेत. या मेळाव्यात बोलताना त्यांनी अजित गव्हाणेंवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

अजित गव्हाणे यांनी स्वार्थासाठी तुतारी फुंकली. काही जण स्वार्थासाठी हिकडं तिकडं गेले, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. मला म्हणतात आता ही विधानसभा भाजपला सुटणार, मग मी कसा आमदार होणार? असं म्हणणाऱ्यांचा विचार करू नका. अजित गव्हाणेंनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि तो गेला. आता त्याचं त्याला लखलाभ, पण आपल्या पक्षात असणारे आणि तळ्यात-मळ्यात करणाऱ्यांना समजून सांगा असंही पुढे अजित पवार म्हणाले आहेत.