बालाजीनगर मधून दुचाकी चोरीला

0
238

भोसरी, दि. २६ एप्रिल (पीसीबी)- बालाजीनगर भोसरी येथे घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना 22 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली.

मिथुन रमेश आटोटे (वय 32, रा. बालाजीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 40 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14/केसी 2495) त्यांच्या घरासमोर मोकळ्या जागेत पार्क केली होती. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.