चिंचवड दि, ०९(पीसीबी) – मुलीचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असल्याचे माहिती असताना तिचा विवाह लावून दिला. या प्रकरणी मुलीच्या आई आणि वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. ८) दुपारी तीन वाजताच्या सुमारास संभाजीनगर चिंचवड येथे घडली.
याप्रकरणी पोलीस नाईक शिवाजी नागरगोजे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश तात्याबा डोके (वय 45) आणि त्याची पत्नी (दोघे रा. कवठे यमाई, ता. शिरूर) आणि इतर लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या मुलीचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी असल्याचे माहिती असतानाही तिचा किशोर पोपट क्षीरसागर (वय 27) याच्याशी विवाह लावून दिला. हा विवाह सोहळा शनिवारी दुपारी संभाजीनगर येथील एका हॉटेलमध्ये सुरू होता. त्यावेळी पोलिसांनी कारवाई करून मुलीच्या आई-वडिलांवर गुन्हा नोंदवला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.










































