पिंपरी, दि. २० (पीसीबी) : बालविवाह प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १४ जुलै रोजी पिंपरी परिसरात घडला. याप्रकरणी बुधवारी (दि. १९) पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीडित मुलीची आई, वडील, सासू, सासरे आणि पती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ आरोपींनी विवाह लावून दिला. लग्नानंतर आरोपी पतीने पीडित मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यात मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.