बालविवाह प्रकरणी पतीसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल

0
551

दिघी, दि. २७ जुलै (पीसीबी) – अल्पवयीन मुलीसोबत लग्न करून तिच्याशी शरीर संबंध ठेवले. त्यात मुलगी गरोदर राहिली. याप्रकरणी पतीसह नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 7 फेब्रुवारी 2022 ते 26 जुलै 2023 या कालावधीत दिघी येथे घडला.

याप्रकरणी पिडीत मुलीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 24 वर्षीय पती, त्याचे आई, वडील आणि दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिला फूस लाऊन तिच्याशी विवाह केला. लग्नानंतर तिच्याशी शरीरसंबंध केले. त्यात पिडीत मुलगी गरोदर राहिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.