दि ९ मे (पीसीबी ) – अल्पवयीन मुली सोबत लग्न केल्याप्रकरणी पतीसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 14 जुलै 2023 ते 7 मे 2024 या कालावधीत लातूर येथे घडला.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासरे, मुलीचे आई आणि वडील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील आरोपींनी तिचा विवाह 23 वर्षीय तरुणासोबत लावला. लग्नानंतर पतीने अल्पवयीन मुली सोबत शारीरिक संबंध ठेवून तिला गरोदर केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.












































