बालगृहातून विद्यार्थी बेपत्ता

0
304

भोसरी, दि. १० (पीसीबी) – दिघी येथील ज्ञानदीप बालगृहातून 16 वर्षीय विद्यार्थी बेपत्ता झालं. ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी घडली.

याप्रकरणी ज्ञानदीप बालगृहाच्या अधीक्षक यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्शनगर, दिघी येथे असलेल्या ज्ञानदीप बालगृहात फिर्यादी या अधीक्षक म्हणून काम करतात. शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांच्या बालगृहातून 16 वर्षीय एक विद्यार्थी बेपत्ता झाला. त्याला अज्ञाताने पळवून नेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.