बालकांचे मोफत आधार कार्ड काढण्यासाठी शिबिराचे आयोजन

0
216

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – तीन महिने ते पाच वर्ष वयोगटातील बालकांचे मोफत आधार कार्ड काढण्यासाठी शिबिराचे आयोजन माजी नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे-पाटील व प्रवर अधीक्षक डाकघर पुणे शहर पूर्व विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आले.

या शिबिरात तीन महिने ते पाच वर्ष वयोगटातील मुलांचे नवीन 114 आधारकार्ड व 43 आधार कार्डधारकांचे मोबाईल नं अपडेट,ई-मेल आयडी अपडेट करण्यात आले.या विशेष मोहीम शिबिरास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

या शिबिरास माजी नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे- पाटील, चिंचवडऑफिसचे जनसंपर्क अधिकारी काळूराम सिताराम पारखी व मयूर भरत बोऱ्हाडे, अशोक सिताराम अवघडे , रामदास निवृत्ती वाकडकर उपस्थित होते.पवना ग्रुपचे रामचंद्र जमखंडी, लतिश बलकवडे,दुर्गेश देशमुख,माणिक म्हेत्रें, जयसिंग मोरे,दत्तात्रय संगमे, संदीपदादा दळवी , महेश बारसावडे, सुरज बेंद्रे, निलेश दळवी, संदीप माने , स्वाती चौधरी , पुष्पा पाटील , दिपाली नेवसे, वर्षा जाधव , हेमा कस्तुरे यांच्या सहकार्याने यशस्विरित्या पूर्ण झाले .