बार कौन्सिलच्या वतीने लोणावळा येथे निवासी अभ्यास शिबिराचा प्रारंभ

0
144

पिंपरी – बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या वतीने लोणावळा येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे गुरुवार, दिनांक २३ मे २०२४ रोजी नवोदित वकिलांसाठी चार दिवसीय निवासी अभ्यास शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप यांची प्रमुख उपस्थिती होती. पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, सचिव ॲड. धनंजय कोकणे, माजी सचिव ॲड. निखिल बोडके, ॲड. मंगेश खराबे यांच्या वतीने न्यायमूर्ती माधव जामदार, प्रमुख जिल्हा न्यायाधीश महाजन, कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप यांचा सत्कार करण्यात आला.

दिनांक २३ मे ते २६ मे २०२४ या कालावधीत संपन्न होणार्‍या या निवासी अभ्यास शिबिरासाठी महाराष्ट्रभरातून अनेक नवोदित वकील बंधू भगिनी यांनी सहभाग नोंदविला आहे. या शिबिरात १ जुलै २०२४ पासून नव्याने लागू होणारे तीन कायदे त्यामध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा, भारतीय साक्ष अधिनियम या कायद्यांबाबत प्रमुख वक्त्याच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या शिबिराचे आयोजन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे विद्यमान अध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप, उपाध्यक्ष ॲड. उदय वारुंजीकर, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲड. आशिष देशमुख, ॲड. संग्राम देसाई, ॲड. जयंत जायभावे यांच्यावतीने करण्यात आले आहे. या शिबिरात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे जवळपास सर्वच सदस्यांनी उपस्थिती दर्शवली. ॲड. पारिजात पांडे, ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. सुभाष घाडगे, ॲड. विवेकानंद घाडगे, ॲड. मोतिसिंह मोहटा, ॲड. वसंत साळुंके, ॲड. सतीश देशमुख, ॲड. असिफ कुरेशी आणि इतर सदस्य उपस्थित होते.