बारावी परिक्षेत मुलिंचच बाजी, निकाल ९३.३७ टक्के, कोकण विभाग पहिला, मुंबई सर्वात कमी

0
140

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार या प्रश्नावर काल २० मे रोजी बोर्डाकडून ठोस उत्तर देण्यात आलं. आज म्हणजेच मंगळवार, २१ मे २०२४ हा दिवस बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली. यंदा राज्यातील १५.१३ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. गेल्यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला होता.

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितल्यानुसार विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. तसेच निकालाची प्रिंट घेता येणार आहे. बारावीच्या निकालाचे क्षणोक्षणीचे लाईव्ह अपडेट्स आम्ही आपल्याला देणार आहोत. त्यामुळे निश्चिन्त व्हा, व निकाल पाहण्यासाठी सज्ज व्हा.
छत्रपती संभाजीनगर विभागातील एका विद्यार्थिनीला १०० टक्के गुण मिळाले आहेत.
विभागीय मंडळनिहाय निकाल
कोकण – ९७.५१

पुणे – ९४.४४

नागपूर – ९२.१२

छत्रपती संभाजीनगर – ९४.०८

मुंबई – ९१.९५

कोल्हापूर – ९४.२४

अमरावती – ९३.००

नाशिक – ९४.७१

लातूर – ९३.३६

शाखानिहाय निकाल असा आहे-
कला – ८५.८८ टक्के
वाणिज्य – ९२.१८
विज्ञान – ९७. ८२ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम – ८७.७५ टक्के
आयटीआय – ८७.६९ टक्के