बारामतीत वंचित चा पाठिंबा सुप्रिया सुळेंना

0
165

दि 3 एप्रिल (पीसीबी )- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात वारंवार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. आता लोकसभा निवडणुकीत वंचितने पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. आंबेडकरांनी बारामतीतून पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. एकीकडे महाविकास आघाडीसोबत सूत जुळले नाही, तर दुसरीकडे पवारांना मदत करण्याच्या आंबेडकरांच्या निर्णयाने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत.
महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी वारंवार चर्चा केली. मात्र जागावाटपावरून त्यांच्यातील बोलणी फिसकटली. दरम्यान, आंबेडकरांनी आघाडीच्या नेत्यांवर टीकाही केली. मात्र कोल्हापूर, नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी बारामतीतून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळेंनाही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.