बारामतीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या? युगेंद्र पवार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत

0
4

दि . १६ ( पीसीबी ) – एकिकडे पवार कुटूंब पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरु असतानाच बारामतीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या संघर्ष पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांमध्ये एकाच कुटूंबातील व्यक्ती एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आता पुन्हा हाच संघर्ष माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. या निवडणूकीवरुन युगेंद्र पवारांनी तार छेडली आहे.

माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक लवकरच होणार आहे. दरम्यानस शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी माध्यमांशी बोलताना निवडणुक लढवण्याचे संकेत दिलं आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर अनेक मागण्यांसाठी आंदोलन झाले. यावेळी युगेंद्र पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी माध्यमांनी त्यांना कारखान्याची निवडणूक लढणार का? असा प्रश्न उपस्थित केला असता, कार्यकर्त्यांनी आम्हाला भरपूर साथ दिली आहे. केवळ लोकसभेलाच नाही तर विधानसभेलाही त्यांनी आम्हाला साथ दिली आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांची इच्छा असले तर त्यांच्या पाठीमागे उभं रहावे लागेल. असं सांगत युगेंद्र पवार यांनी निवडणूक लढवण्याची संकेत स्पष्ट केले आहेत.

तसेच, सक्षम उमेदवार मिळत असतील आणि माळेगावचा छत्रपती होऊ द्यायचा नसेल तर निवडणूक लढवावी लागेल, असही युगेंद्र पवार यावेळी म्हणाले. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर माळेगावमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत रंगण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या अशी लढत झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. या निवडणुकीत काका म्हणजेच अजितदादांनी मोठ्य मताधिक्क्याने विजय मिळवला.

तर विधानसभेपूर्वी लोकसभा निवडणुकीतही खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाली होती. लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला. दरम्यान, आता पुन्हा एकदा बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या लढत पाहायला मिळणार आहे.