बारामतीत तरूणावर कोयत्याने सपासप वार

0
3

 दि. 20 (पीसीबी) – गेल्या काही महिन्यांत बारामतीमधील गुन्ह्याच्या घटना प्रचंड वाढल्या असून सहा महिन्यांमध्ये तिसरा खून झाल्याने बारामतीकर अक्षरश: हादरले आहेत. बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम छत्रपती रस्त्यावर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एका 23 वर्षांच्या तरूणाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. यामुळे बारामतीमध्ये प्रचंड खळबळ माजली असून शहरात भीतीचे वातावरण आहे. लोकं जीव मुठीत धरून जगत आहेत. सहा महिन्यांपूर्वीदेखील असाच खून करण्यात आला होता. आता सहा महिन्यांच्या आत तिसरी हत्या झाल्याने गावात दहशत पसरली आहे. अनिकेत सदाशिव गजाकस असे तरूणाने नाव असून फक्त एका मुलीशी बोलला या कारणावरून थेट त्याचा जीवच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मान, हात, डोळे, नाकावर कोयत्याने वार करण्यात आल्याने अनिकेत गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू होते. मात्र त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली आणि त्याने रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.