बारणे यांच्या पिंपरीगावातील निवडणूक कचेरीचे आठवले यांच्या हस्ते उद्घाटन

0
96
  • निवडणूक कचेरी सुरू करत पिंपरीगावातही बारणे यांची मुसंडी

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या पिंपरीगावातील निवडणूक कचेरीचे उद्घाटन रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते काल (बुधवारी) रात्री करण्यात आले.

पिंपरीच्या डॉ. आंबेडकर चौकात जाहीर प्रचार सभा संपल्यानंतर आठवले यांनी पिंपरीगावात जाऊन निवडणूक कचेरीचे फीत कापून औपचारिक उद्घाटन केले. माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पुढाकाराने हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळी पोहचण्यास विलंब झाल्याने आचारसंहितेमुळे कोणाचीही भाषणे होऊ शकली नाहीत. निवडणूक कचेरीच्या बाहेर पिंपरी गावातील रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती.

निवडणूक कचेरीच्या उद्घाटनप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, आरपीआयचे नेते बाळासाहेब भागवत, परशुराम वाडेकर, चंद्रकांता सोनकांबळे, कुणाल वाव्हळकर, भाजपचे नेते सदाशिव खाडे, अमित गोरखे तसेच माजी नगरसेवक संदीप वाघेरे, नारायण बहिरवाडे, ज्योतिका मलकानी तसेच चंद्रशेखर अहिरराव व महायुतीचे माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.