पुणे, दि. २६ (पीसीबी) : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. बांगर अमरावती जिल्ह्यामध्ये दाखल होताच अंजनगाव सुर्जीमध्ये संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला चढवला होता. यावर संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बायको आणि बहिण सोबत नसते तर हल्लेखोरांना जशास तसे उत्तर दिले असते असं म्हणत संतोष बांगर यांनी हल्ले खोरांना थेट धमकीच दिली आहे.
याला हल्ला म्हणता येणार नाही. हल्ला कशाला म्हणतात. समोरुन येवून सामना करतात त्याला हल्ला म्हणतात. हे ठरवून केलेले कृत्य आहे असं बांगर म्हणाले.माझी बहीण आणि माझी पत्नी जर माझ्यासोबत नसत्या तर त्यांना संतोष बांगर काय आहे हे त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं असतं अशी धमकी बांगर यांनी दिली आहे. ज्या पद्धतीने हा हल्ला झालाय याला मर्दानगी म्हणता येणार नाही. माझी बहीण आणि माझी पत्नी जर त्या कारमध्ये नसते एक घाव दोन तुकडे केले असते. असं जर मी केले नसते तर मी सरसेनापती बाळासाहेब ठाकरे चा शिवसैनिक म्हणून घेण्याच्या लायकीचा नसतो असे चॅलेंजही बांगर यांनी दिले.