बायकोला सरपंच पद न मिळाल्‍याने एकास मारहाण

0
47

खेड, दि. 27 (पीसीबी) : बायकोला सरपंच पद मिळाले नाही, या रागातून एकाला मारहाण करण्‍यात आली. तसेच दुचाकीचेही नुकसान केले. ही घटना सोमवारी (दि. २५) मध्‍यरात्री खेड तालुक्‍यातील अहिरे या गावात घडली.

नितिन सखाराम तांबे असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. नारायण रामचंद्र अहेरकर (वय ५५, दोघेही रा. मु. अहिरे, ता. खेड, जि. पुणे) असे मारहाणीत जखमी झालेल्‍या नागरिकाचे नाव असून त्‍यांनी याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पत्‍नीला सरपंच पद मिळाले नाही, या कारणावरून चिडलेला आरोपी तांबे चारचाकी वाहनातून फिर्यादी यांच्‍या घरासमोर आला. बिअरच्‍या बाटलीने फिर्यार्दी अहेरकर यांच्‍या भुवईवर, डोळ्याच्‍या खाली, तोंडावर मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत जिवे मारण्‍याची धमकी दिली. तसेच आरोपीने आपली चारचाकी गाडी जोराने पाठीमागे घेत फिर्यादी अहेरकर यांच्‍या दुचाकीवर घालून तिचे नुकसान केले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.