बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबाराचे कारण समोर

0
79

मुंबई, दि. १३ –
महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्या आहेत, मात्र या धक्कादायक घटनेत बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय? :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, आज रात्री नऊच्या सुमारास दोन अज्ञात तरुणांनी बाबा सिद्दीकी यांच्या मुलाच्या म्हणजेच आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर गोळीबार केला. या गोळीबारात अज्ञात तरुणांनी पाच ते सहा गोळ्या झाडल्या. मात्र त्यामधील तीन गोळ्या बाबा सिद्दीकी यांना लागल्या. ही संपूर्ण घटना बांद्रा पूर्वेत खेरवाडी परिसरात घडली आहे.

तसेच बाबा सिद्धिकी यांना एक गोळी लागल्यानंतर ते जमिनीवर खाली कोसळले. त्यानंतर नागरिकांनी त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण घटनेत बाबा सिद्धिकी यांच्यासोबत त्यांचा एक सहकारी होता. या गोळीबारात बाबा सिद्धिकी यांच्या सहकाऱ्याच्या पायाला देखील एक गोळी लागली आहे. मात्र आता त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


या घटनेनंतर मुंबई गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेतील दोन अज्ञात तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. गोळीबार करणाऱ्या अज्ञातांना ताब्यात घेतलं आहे. यामधील दोन आरोपींपैकी एक आरोपी हा हरियाणाचा आणि दुसरा आरोपी हा उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे उत्तर भारतातील मोठ्या गँगचा हात असल्याचा संशय असल्याचं बोललं जात आहे. मात्र आता या घटनेचा सखोल तपास पोलीस करत आहेत.