बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी खळबळजनक माहिती समोर!

0
55

दि. 13 (पीसीबी) राज्याचे माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 12 ऑक्टोबर 2024 रोजी वांद्रे पूर्व परिसरातील खेरवाडी बाब सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हत्या प्रकरणातील पहिला आरोपी हा करनैल सिंह असून तो मुळचा हरियाणाचा आहे. तर दुसऱ्या आरोपीचेे नाव धर्मराज कश्यप असे असून तो मुळचा उत्तर प्रदेश राज्याती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून कट शिजत होता. बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी तीनही आरोपी हे रिक्षाने घटनास्थळी आले होते. तसेच तीनही आरोपी बाबा सिद्धिकी बाहेर येण्याची वाट पाहात होते.

बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणारे आरोपी 2 सप्टेंबरपासून कुर्ल्यात भाड्याने खोली घेऊन राहत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी या खोलीसाठी महिन्याला 14 हजार भाडं देत होते. चार जणांनी मिळून बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची 200000 रुपयांची सुपारी घेतली होती. प्रत्येकी 50 हजार रुपये ते वाटून घेणार असल्याचंही कळते.

बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणारे आरोपी 2 सप्टेंबरपासून कुर्ल्यात भाड्याने खोली घेऊन राहत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी या खोलीसाठी महिन्याला 14 हजार भाडं देत होते. चार जणांनी मिळून बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची 200000 रुपयांची सुपारी घेतली होती. प्रत्येकी 50 हजार रुपये ते वाटून घेणार असल्याचेही कळते.

यांच्यावर रात्री अंत्यसंस्कार

बाबा सिद्दिकी यांच्यावर मुस्लीम धर्मानुसार अंत्यसंस्कार होणार आहेत. बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव मारिन लाईन येथील बडा कब्रस्तान येथे आणले जाईल. रात्री 8.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर दफनविधी होईल. यापूर्वी बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव बांद्रा येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

बाबा सिद्दिकी यांची हत्या ही एसआरए प्रकल्पाच्या वादातून झाली, असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने वा अधिकृत व्यक्तीने माहिती दिलेली नाही.