बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा सूत्रधार सापडला

0
1

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावरही हल्ला करण्यात आलेला. या दोन्ही घटनांमागे बिश्नोई गँग असल्याचं समोर आलेलं. तसेच, त्यानंतर बाबा सिद्दिकी हत्याकांडमध्ये दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये मुंबई क्राईम ब्रांचनं खुलासा केलेला की, बाबा सिद्दिकींच्या हत्येचा मास्टरमाईंड गुजरात साबरमती जेलमध्ये कैद असलेला गँगस्टर लॉरेंस बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई आहे. तसेच, सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराच्या घटनेचा मास्टरमाईंडही अनमोलंच असल्याचं समोर आलेलं. अशातच आता अनमोल बिश्नोईला कॅनडातून अटक करण्यात आल्याचं बोललं जातंय. दरम्यान, अनमोल बिश्नोईच्या अटकेच्या कारवाईवर मात्र, मुंबई पोलिसांकडून कुठलंही स्पष्टीकरण किंवा दुजोरा देण्यात आलेला नाही.

माजी आमदार बाबा सिद्धीकी आणि अभिनेता सलमान खान याच्या घरावर हल्ला करणाऱ्या गुन्ह्यातील मास्टर माईंड अनमोल बिष्णोई याला कॅनडातमध्ये अटक करण्यात आल्याचं बोललं जात आहे. या अटकेच्या कारवाईवर मात्र मुंबई पोलिसांकडून कुठलंही स्पष्टीकरण किंवा दुजोरा देण्यात आलेला नाही. भारतीय तपास यंत्रणा सध्या कॅनडा अधिकाऱ्यांकडून अटकेत असलेल्या व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम करत आहेत.

रशियन पासपोर्टवर प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला कॅनडा पोलिसांनी अटक केली आहे, अटकेत असलेल्या व्यक्तीकडे रशियन पासपोर्ट आढळला असून तो बनावट असल्याचा संशय आल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. त्याचा फोटो भारतीय अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला असून, चेहऱ्याची मिळतीजुळती वैशिष्ट्य लक्षात घेता, तो अनमोल बिश्नोई असण्याची शक्यता बळावली आहे.