बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे रणनीतीकार नरेश अरोरा यांनी व्यक्त केला शोक

0
73

मुंबई, दि. 14 (पीसीबी) : डिझाईन बॉक्सचे सह संस्थापक आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे रणनीतीकार नरेश अरोरा यांनी माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर शोक व्यक्त केलाय. बाबा सिद्दिकी यांच्या मृत्युमुळे मला मोठा धक्का बसला असल्याचेही अरोरा म्हणाले. शिवाय त्यांनी बाबा सिद्दिकी यांच्या शेवटच्या भेटीचीही आठवण सांगितली.

डिझाईन बॉक्सचे सह संस्थापक आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे रणनीतीकार नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांच्या निधनानंतर संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ते या पोस्टमध्ये लिहितात,”आम्ही दोन दिवसांपूर्वीच भेटलो होतो. मी आणि बाबा सिद्दिकी काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भेटण्याचा विचार करत होतो. पण नियतीने काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. त्यांच्या जाण्यामुळे मला मोठा धक्का बसलाय.

निवडणूक रणनीतीकार नरेश अरोरा पुढे म्हणाले, जेव्हा असं कोणी सोडून जातं, तेव्हा आपण त्यांच्या जाण्यामुळे आश्चर्यही व्यक्त करतो. बाबा सिद्दीकी खूप लवकर आम्हाला सोडून गेले. परंतु त्यांनी प्रेमाने परिपूर्ण आयुष्य जगले. अरोरा यांनी एक भावनिक व्हिडिओ क्लिप देखील शेअर केली. ज्यामध्ये ते आणि बाबा सिद्दीकी निवडणूक रणनीती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील योजनांबद्दल बोलताना दिसत आहेत.