बाबा ये अन माझ्या खुर्चीवर बस !

0
61
  • आकुर्डीतील मेळाव्‍यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली बाबा कांबळे यांना स्वतःची खुर्ची
  • उपमुख्यमंत्र्यांच्‍या त्‍या कृतीने बाबा कांबळे यांचे राजकीय वजन वाढले, दादांनी गोरगरीब कामगार कष्टकरांप्रती आदरभाव व्यक्त केला अशीही चर्चा यावेळी रंगली,
  • बहुजन कष्टकरी मागासवर्गीयांचा हा सन्मान :- बाबा कांबळे

पिंपरी, दि. १० (पीसीबी) –
बाबा समोर का उभा आहेत. ये आणि माझ्या नावाने असलेल्‍या आणि रिकामी झालेल्‍या खुर्चीवर बस, म्‍हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेत उभे असणाऱ्या कष्टकरी कामगार नेते बाबा कांबळे यांना मंचावर बसण्याची सूचना केली. महायुतीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्‍या प्रचारार्थ काळभोरनगर आकुर्डी येथे प्रचाराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जनतेत उभे असलेल्‍या बाबा कांबळे यांना मंचावर बोलावून बसण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी सूचना केली. पवारांच्‍या या कृतीमुळे बाबा कांबळे यांचे राजकीय वजन वाढल्‍याची राजकीय चर्चा रंगली होती.

राज्‍यात निवडणूकांचे रणांगण तापले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना, बंडखोरांची समजून काढताना ज्‍येष्ठ नेत्‍यांची कसरत होत असताना महाराष्ट्राने पाहिले आहे. पिंपरी विधानसभेतही हेच चित्र होते. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी आमदार अण्णा बनसोडे यांना मिळाली. कष्टकऱ्यांना संधी दिली जात नाही. केवळ मतांपुरते गृहित धरले जाते, असे म्‍हणत कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा करून बाबा कांबळे यांना आपला अर्ज माघार घ्यायला लावला.

शब्दाला मान दिल्‍याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबा कांबळे यांचा आकुर्डीतील बैठकीत उल्‍लेख केला. बाबा कांबळे यांनी वेळोवेळी व सतत पाठपुरवठा केल्यामुळे महायुती सरकारने रिक्षा कल्‍याणकारी महामंडळाचे स्थापन केले आहे, कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांना विधान परिषद आमदार किंवा योग्य संधी मिळावी आशी मागणी त्‍यांच्‍या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची भावना आहे. बाबा हा आमदारकिच्या तोला मोलाचा कार्यकर्ता आहे, त्‍याचाही सकारात्‍मक विचार केला जाईल, बाबा कधी माझ्याकडे स्वतःच्या मागण्यासाठी आला नाही नेहमी त्यांनी रिक्षा चालक फेरीवाली व कष्टकऱ्यांच्या मागण्या साठी आग्रही धरला आहे ज्या घटकांमध्ये बाबा काम करत आहे त्या घटकांचे देखील प्रश्न सोडवले जातील असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले. मंचावर जागेअभावी तसेच नियोजनात बाबा कांबळे यांचे नाव नसल्‍याने ते समोर जनतेमध्ये उभे होते.

या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबा कांबळे यांना उद्देशून तिकडे का उभा आहेस, मंचावर ये म्‍हणत पुढे येण्याची सूचना केली. मंचावर खुर्ची नसल्‍याचे दिसताच माझ्या नावाने असलेल्‍या आणि रिकामी झालेल्‍या खुर्चीवर बस म्‍हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागा उपलब्ध करून दिली. पवारांच्‍या या कृतीमुळे उपस्‍थित सभागृहातील पदाधिकारीही अवाक झाले होते. तसेच बाबा कांबळे यांची राजकीय इमेज वाढल्‍याची देखील चर्चा केली जात होती.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला भर सभेत बोलवून पुढे बसायला सांगितले. सर्व सामान्‍य घटकांसाठी मी काम करत आहे. त्या घटकांच्‍या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. त्‍यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. अजित दादा पवार हेच खऱ्या अर्थाने गोरगरीब मागासवर्गीय बहुजन कष्टकऱ्यांना न्याय देऊ शकतात, हे या कृतीने सिद्ध झाले आहे. असंघटित कामगार, कष्टकरी रिक्षा चालक, फेरीवाले, बांधकाम मजूर, साफसफाई कामगार, महिला, धुणी-भांडी काम करणाऱ्या व कागद काच पत्रे गोळा करणाऱ्या महिलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्‍ही लढा देतोय. या घटकांना सामाजिक सुरक्षा नाही. त्यांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा मिळावी. यासाठी माझा लढा सुरू आहे. या घटकांना राजकीय महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना महायुतीला पाठिंबा दिला आहे.

  • बाबा कांबळे, अध्यक्ष, कष्टकरी कामगार पंचायत.