बांधकाम साहित्याच्या गाड्या खाली करण्यासाठी मागितली खंडणी

0
229

हिंजवडी, दि. ८ (पीसीबी) – बांधकाम साहित्याच्या गाड्या खाली करण्यासाठी प्रत्येक गाडीमागे ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. ६) दुपारी सुस येथे एका बांधकाम साईटवर घडला.

रवींद्र वाघू तुपे (वय ४६, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिनेश ससार (रा. सुस, ता. मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुस येथील एका बांधकाम साईटवर येणाऱ्या बांधकाम साहित्याच्या गाड्या खाली करण्यासाठी प्रत्येक गाडीमागे ५० हजार रुपये देण्याची दिनेश याने मागणी केली. बांधकाम साईटवरील स्टोअर इनचार्ज, कामगार, वाहन चालक आणि क्लिनर यांना दिनेश याने जीवे मारण्याची धमकी देत आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.