बांधकाम साईट वरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

0
17

रावेत, दि .7 (पीसीबी)
बांधकाम साईटवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना १ ऑगस्ट २०२४ रोजी घडली असून याप्रकरणी ६ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जसवंत मुकुंदा यादव (वय ३०, रा. पुनावळे) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. संतोष मुकुंदा यादव (वय ३९, रा. छत्तीसगड) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंत्राटदार आनंद मारुती गाडे (वय ४७) आणि सुपरवायजर देवप्पा आयप्पा अंबिगर (वय ४२, रा. कर्नाटक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष यांचा भाऊ जसवंत हा रावेत येथील अपना घर या बांधकाम साईटवर काम करत होता. आठव्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. आरोपींनी बांधकाम साईटवर कामगारांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. तसेच कामगारांना सुरक्षा साधने न दिल्याने हा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.