बांधकाम साईटवरून 2 लाखांचे साहित्य चोरीला

0
155

पुणे, दि. ३१ (पीसीबी) – लोखंडी वॉलर व बांधकाम साहित्य असे एकूण 2 लाखांचे साहित्य चोरीला गेल्या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चोरी लोढा बेलमंडो सोसायटी येथे रविवारी (दि.28) ते सोमवारी (दि.29) या कालावधीत घडली.

याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात पंकज किरीटकुमार पटेल (वय 60 रा.पुणे) यांनी फिर्याद दिली. यावरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मालकीचे 68 हजार रुपयांचे 9 फुटाचे 34 लोखंडी वॉलर व 40 फुटाचे 12 हजार रुपयाचे 30 लोखंडी वॉलर,12 हजार 250 रुपयांचे 35 लोखीं लेजर व बांधकाम साहित्य असा एकूण 2 लाख 2 हजार 550 रुपयांचे साहित्य अज्ञात चोराने चोरून नेले आहे. यावरून शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.