बांधकाम साईटवरून सहा लाखांचे कन्स्ट्रक्शन साहित्य चोरीला

0
262

हिंजवडी, दि. १ (पीसीबी) – वाकड येथील एका बांधकाम साईटवरून अज्ञात चोरट्याने सहा लाख 19 हजार 500 रुपयांचे कन्स्ट्रक्शन साहित्य चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 29) रात्री साडेआठ ते सोमवारी (दि. 30) दुपारी पाच वाजताच्या कालावधीत विनोदे वस्ती, भूमकर चौक वाकड येथे घडली.

शुभम गणेश शिंदे (वय 26, रा. आकुर्डी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बोनहेर वाकड लिनस ग्रुप या बांधकाम व्यवसाय करणा-या कंपनीत साईट इंजिनिअर म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीची विनोदे वस्ती वाकड येथे बांधकाम साईट सुरु आहे. त्यांनी कन्स्ट्रक्शनसाठी साईटवर पार्किंगमध्ये ठेवलेले सहा लाख 19 हजार 500 रुपयांचे कन्स्ट्रक्शन साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.