बांधकाम साईटवरून पडल्याने सेल्स एक्झिक्युटिव्हचा मृत्यू

0
889

वाकड, दि. २० (पीसीबी) – ग्राहकांना सदनिका दाखवत असताना बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून सेल्स एक्झिक्युटिव्हचा मृत्यू झाला. ही घटना 23 डिसेंबर 2023 रोजी निसर्ग बेलारोझ सोसायटी, वाकड येथे घडली.

आशिष जव्हेरी (वय 43) असे मृत्यू झालेल्या सेल्स एक्झिक्युटिव्हचे नाव आहे. याप्रकरणी आशिष यांच्या पत्नीने 19 मार्च 2024 रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ठेकेदार गुड्डू कसनु पवार (वय 40, रा. भूमकर वस्ती, हिंजवडी) आणि सेल्स विभाग प्रमुख अभिषेक अभय देवने (वय 26, रा. वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथे निसर्ग बेलारोझ सोसायटी या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. तिथे आशिष हे सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होते. 23 डिसेंबर रोजी ते एका ग्राहकाला सदनिका दाखवण्यासाठी गेले. सहाव्या मजल्यावर सदनिका दाखवत असताना त्यांचा तोल जाऊन ते लिफ्टच्या डक्टमध्ये पडले. बांधकामाचे ठेकेदार आणि सेल्स विभागाचे प्रमुख यांनी बांधकाम साईटवर कामगारांच्या सुरक्षेची काळजी न घेतल्याने हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.