बांधकाम साईटवरून एक लाख रुपयांच्या लोखंडी प्लेटची चोरी

0
261

चाकण, दि. २७ (पीसीबी) – चाकण येथे एका बांधकाम साईटवरुन एक लाख रुपयांच्या लोखंडी प्लेट चोरीला गेल्या आहेत. हा प्रकार सोमवार (दि.25) रात्री सात ते मंगळवारी (दि.26) सकाळी सात या कालावधीत घडला.

याप्रकरणी बांधकाम व्यावसायीक सागर लक्ष्मण गोरे (वय.35 रा.आंबेठाण) यांनी चाकण पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आंबेठाण रोड येथे चाकण सौंदर्य बिल्डींगचे काम सुरु आहे. या बिल्डींग साईट वरून चोरट्यांनी 1 लाख 8 हजार रुपयांच्या 120 लोखंडी प्लेट चोरून नेल्या आहेत.यावरून चाकण पोलीस पुढिल तपास करीत आहेत.