बांधकाम साईटवरील साहित्य चोरीला

0
350

पुनावळे, दि. १२ (पीसीबी) – बांधकाम साईटवरून ९७ हजारांचे साहित्य अज्ञातांनी चोरून नेले. ही घटना १ मार्च रोजी रात्री नऊ ते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत काटे वस्ती, पुनावळे रावेत येथे घडली.

संदीप मुरलीधर पाटील (वय ३०, रा. सिंहगड रोड, पुणे) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पुनावळे येथे बांधकाम साईट सुरु आहे. त्या साईटवरून अज्ञातांनी ९७ हजार ७५० रुपये किमतीचे बांधकाम साहित्य चोरून नेले. रावेत पोलीस तपास करीत आहेत.