बांधकाम साइटवर बळजबरी घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांना अटक

0
612

भोसरी, दि. २५ (पीसीबी) – बांधकाम सुरू असलेल्या जागेवर बळजबरी जात तेथे शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. ही घटना पाच जुलै ते 24 ऑगस्ट 2023 या कालावधीत भोसरीतील चक्रपाणी वसाहत येथे घडली आहे.

या प्रकरणी राजकुमार सिद्धप्पा कळसे (वय.45 रा.भोसरी) यांनी गुरुवारी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून एक महिला आरोपी व रुपेश उर्फ गोटया ज्ञानेश्वर देवकर (वय 24 रा भोसरी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मालकीच्या जागेवर त्यांचे बांधकाम सुरू होते. यावेळी आरोपी त्या जागेवर बळजबरी आले व त्यांनी बांधकामाचे खांब काढून बांधकामाचे नुकसान केले. त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या फिर्यादी यांच्या पत्नी व सुनेला शिवीगाळ करत अंगावर धावून गेले. तसेच मी मर्डर करून जेलमधून आलो आहे मी तुला संपवून टाकेन अशी धमकी दिली. तसेच मी इथून हलत नाही म्हणत तेथेच जागेवर थांबून राहिले. यावरून भोसरी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.